चीनच्या बाहेरील सर्व रिटेल स्टोअर्स 27 मार्च पर्यंत बंद

सोमवार, 16 मार्च 2020 (09:42 IST)
जगभरात दहशत पसरवणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे एपलने चीनच्या बाहेरील सर्व रिटेल स्टोअर्स 27 मार्च पर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या दरम्यान एपलचे सर्व कर्माचारी घरातून काम करणार आहेत. अमेरिकेत आतापर्यंत 57 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे अमेरिकेतील अनेक स्टोअर बंद करण्यात आले. एपलकडून वर्ल्डवाईड डेवलेपर्स कॉन्फरन्सही ऑनलाईन घेतली  जाणार आहे.
 
कोरोना व्हायरसवर कंट्रोल मिळवण्यासाठी आणि लोकांमध्ये याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी एपलकडून 15 मिलियन डॉलरची घोषणा करण्यात आली आहे. अपलचे सीईओ टिम कुक यांनी अपलच्या अधिकृत वेबसाईटवरुन ही माहिती दिली. याशिवाय अपलने कर्मचाऱ्यांनाही स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना मदत करण्याचे सांगितले आहे. तसेच कुक यांनी 27 मार्चपर्यंत चीनसोडून जगभरातील सर्व अपल स्टोअर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
“एपलचे जगभरात 400 पेक्षा अधिक स्टोअर्स आहेत. ऑफलाईन स्टोअर्स बंद असले तरी ऑनलाईन सेवा आमची सुरु राहिल. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने तुम्ही प्रोडक्ट खरेदी करु शकता”, असंही कुक यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती