दुग्धविकास, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार कोरोना पॉझिटिव्ह

शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020 (08:53 IST)
राज्याचे दुग्धविकास आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनाची लक्षणं असल्यामुळे सुनिल केदार यांना मुंबईच्या ब्रिच कॅण्डी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
 
याआधी महाविकासआघाडी सरकारमधल्या सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनाही कोरोनाची लागण झाली होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती