'या' सर्व लोकांना आरोग्य सेतू अ‍ॅप बंधनकारक

शनिवार, 2 मे 2020 (16:13 IST)
सरकारने खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनाही आरोग्य सेतू अ‍ॅप बंधनकारक केले आहे. ‘१०० टक्के म्हणजे सर्व कर्मचार्‍यांच्या फोनमध्ये आरोग्य सेतू अ‍ॅप असेल हे सुनिश्चित करण्याची जबाबदारी संबंधित संस्थांच्या प्रमुखांची असेल’, असे केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये स्पष्ट केले आहे.

आरोग्य सेतू हे अ‍ॅप करोना व्हायरसला रोखण्याच्या हेतूने डिझाइन केलेले आहे. कंटेनमेंट झोनमध्ये राहणारे सर्व लोक त्यांच्या फोनमध्ये आरोग्य सेतू अ‍ॅप डाउनलोड करतील याची स्थानिक प्रशासनाने खात्री करावी, असेही गृह मंत्रालयाने म्हटले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती