आमिरने दिली गुप्त देणगी

गुरूवार, 9 एप्रिल 2020 (13:03 IST)
मदत निधीला पैसे देत नाहीत तर ते रोजंदारी मजुरांनाही मदत करत आहेत. मदत करणार्‍या सेलिब्रिटींच्या यादीत आमिर खानचे नाव ऐकिवात न आल्याने सोशल मीडिया यूजर्सनी त्याच्यावर प्रश्नचिन्ह उभे केले. पण सत्य मात्र वेगळे आहे. या संकटाच्या घडीत आमिरही संपूर्ण देशासोबत उभा आहे.

अभिनेतच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर आमिरने पीएम केअर्स फंड आणि महाराष्ट्राच्या सीएम रिलीफ फंडसह फिल्म   वर्क्स असोसिएशन आणि काही स्वंसेवी संस्थांना आर्थिक मदत पाठविली आहे. त्याचबरोबर त्याने आपल्या ‘लालसिंग चड्ढा' चित्रपटासाठी काम करणार्‍या   रोजंदारी मजुरांनाही मदत केली आहे. आमिरला यासंदर्भात पब्लिसिटी नको, म्हणून त्याने केलेल्या मदतीची फारशी माहिती समोर आलेली नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती