आवळा गुळाची आंबट गोड चटणी

सोमवार, 15 एप्रिल 2019 (12:17 IST)
आवळ्याची चटणीतर तुम्ही बर्‍याचवेळा खाल्ली असेल पण आज आम्ही तुम्हाला आवळ्याची आंबटगोड चटणीची रेसिपी सांगत आहोत.    
 
साहित्य : 
100 ग्रॅम आवळे  
100 ग्रॅम गूळ   
दोन हिरव्या मिरच्या   
1/2 चमचे जिरे  
आलाचे 3-4 लहान तुकडे   
मीठ चवीनुसार   
 
कृती : 
सर्वप्रथम आवळ्यांना चांगल्या प्रकारे धुऊन त्याचे काप करून त्याला अर्धा तासापर्यंत मिठाच्या पाण्यात भिजून ठेवावे. पाण्यामधून आवळे काढून त्याची बी काढून घ्या. आता सर्व साहित्य एकत्र करून बारीक वाटून घ्यावे. आणि गरमा गरम पराठ्यासोबत ते सर्व्ह करावे.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती