इमू पालन- बेरोजगारीवर मात!

PR
PR
मुलानं शिकून मोठं व्हावं...नोकरी करावी...साहेब बनावं, असं ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाचं स्वप्न असतं. सुशिक्षित बेरोजगारीचे लेबल लावून तरूणांचे लोंढे शहराकडे येतात. नोकरीच्या मागे धाव-धाव धावतात व अपयश घेऊन गावाकडे परतात. मात्र आता अशा तरूणांनी खचून न जाता शहामृग पालन(इमू) हा व्यवसाय करून उज्जव भविष्य साकारू शकतात. बेरोजगारीवर मात करण्याची सुवर्ण संधी सुशिक्षित तरूणांना पायाभोवती पिंगा घालत आहे. मात्र यासाठी प्रचंड इच्छाशक्ती तर आवश्यक असतेच सोबत जिद्दही जरूरी असते.

कोंबडी पालन आणि शहामृग पालनात फारसा तार्कीक दृष्ट्या फरक नाही. मात्र व्यवसाय म्हटला की रिक्सही आलीच. फुकटचा सल्ला देणारे समाजात बरेच भेटतात. मात्र ऐकावे जनाचे... करावे मनाचे ही संताची शिकवण आठवायची असते. शहामृग पालन करण्‍यासाठी जवळ- जवळ सर्वच राष्ट्रकृत बॅंकांकडून वित्तसहाय्य मिळू शकते. जिल्हा उद्योग केंद्र व खादी ग्रामोद्योग यांच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाते तससेच कर्ज पुरवठा ही होत असतो. पुणे येथेही सरकारी किंवा खाजगी संस्थांकडून अवघ्या 15 दिवसांचे प्रशिक्षण घेऊन आपण व्यवसाय सुरू करू शकतो.

केवळ आफ्रिकेत आढळणारा हा पक्षीवर्गीय प्राणी भारतातल्या आसाम, मिझोराम, जम्मू काश्मिर भागातही आढळतो. शहामृग पालनात महत्वाची बाब म्हणजे शहामृग व्यवसायिक दृष्टीने वाढविले पाहिजेत. त्यांना देण्यात येणारे खाद्य विहीत केलेलेच असावे जेणेकरुन शहामृगाची वाढ चांगली होवू शकते. चांगले शहामृग ताशी 40 मैल वेगाने पळू शकते. यासाठी शहामृग ठेवलेल्या जागेला 10 फूट उंचीची लोखंडी जाळीचे कुंपन करणे आवश्यक आहे.
शहामृगाला उन्हाचा त्रास असतो. मात्र 55 डिग्री सेल्सीअसपर्यंतच्या तापमानात ते राहू शकतात. शहामृग साधारणपणे वयाच्या 18 महिन्यांनंतर अंडी द्यायला सुरुवात करतात. दरवर्षी ते थंडीच्या महिन्यात 35 ते 40 अंडी देतात. हिरव्या गर्द रंगाची ही अंडी कोंबडीच्या अंड्यापेक्षा साधारणतः वीस पटीने मोठी असतात. एक अंडे साधारण 600 ते 700 ग्रॅम एवढे असतात. ते 600 ते 800 रु. दराने विकले जाते. एक पक्षी सुमारे 35 ते 40 वर्ष जगतो.

शहामृह हा पक्षी मूळचा ऑस्ट्रेलियातील असला तरी त्याची शेती आता अमेरिका, भारत, चीन व युरोपमधील अनेक देशांमध्ये सुरू झाली आहे. त्याचे मांस पंचतारांकित हॉटेलमध्ये चवीने खाल्ले जाते. त्याच्या कातडीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठे मोल आहे ते ती अत्यंत नरम असल्याने आणि तिच्यावर कोणताही रंग खुलत असल्याने. शहामृगाच्या चरबीपासून मिळणार्‍या तेलालाही चांगला भाव मिळतो.

शहामृगाच्या अंड्याच्या कवचा ही उपयोग केला जातो. त्यावर कोरीव नक्षी करून शोपिस म्हणून त्याचा वापर केला जातो. भारतात शेती‍ला जोड धंदा म्हणून शहामृग पालन व्यवसायाकडे पाहिले जाते.

मेथी गवत, पालेभाज्या यांसारख्या खाद्यावर अतिशय प्रतिकूल परिस्थितीत ही शहामृग जगत. त्याची रोगप्रतिकारक शक्ती प्रंचड असते. परिपूर्ण वाढलेल्या शहामृगाचे वजन 40 ते 50 किलो असून त्याची उंची सहा फूट असते. कमी खर्चात, अल्पावधीत नोकरीपेक्षा जास्त उत्पादन मिळवून देणारा हा व्यवसाय तरुणांना उज्जल भविष्य देणाराच म्हटला जाईल.

वेबदुनिया वर वाचा