दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येणार नाही

शुक्रवार, 2 एप्रिल 2021 (16:54 IST)
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे प्रात्याक्षिक परीक्षांबाबत शिक्षण मंडळाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. दहावी बारावीच्या परीक्षा एप्रिल-मे महिन्यामध्ये घेण्यात येणार आहे. कोरोनाचा संसर्गाचा विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, म्हणून दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येणार नाही. बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा मर्यादित स्वरूपात घेण्यात येणार आहेत.  राज्य मंडळाने दिलेल्या मार्गदर्शक सूचीप्रमाणे दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परीक्षेऐवजी त्यावर आधारित गृहपाठ किंवा लेखनकार्य देण्यात येणार आहे.  विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक  आधारित लेखन कार्य 21 ते 10 जून दरम्यान शाळांमध्ये जमा करावे लागणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती