लष्करी शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी परीक्षा 10 जानेवारी 2021 रोजी घेतली जाणार

बुधवार, 18 नोव्हेंबर 2020 (15:27 IST)
अखिल भारतीय सैनिक शाळेत प्रवेश परीक्षा 10 जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे. 
 
संरक्षण मंत्रालयाने हे जाहीर केले की देशभरातील 23 राज्य आणि एका केंद्र शासित प्रदेशातील 33 लष्करी किंवा सैनिक शाळेत सहावी ते नववी वर्गासाठीची प्रवेश परीक्षा राष्ट्रीय चाचणी संस्था (NTA) येत्या 10 जानेवारी रोजी घेणार आहे.
 
या परीक्षेसाठी उमेदवार 19 नोव्हेंबर पर्यंत ऑनलाईन नोंदणी करू  शकतील. उमेदवार aisee.nta.nic.in वर नोंदणी केल्यावर अर्ज सादर करण्यास सक्षम असतील. 
 
या विषयी सविस्तार माहिती बुलेटिन एनटीए (NTA) साईटवर उपलब्ध आहे. 
 
शैक्षणिक सत्र 2021-22 पासून, लष्करी शाळेत प्रवेश घेण्यासाठी इतर मागास वर्गीय विद्यार्थ्यांना देखील 27 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व 33 लष्करीय शाळेत 6 वीच्या प्रवेशासाठी आता मुली देखील प्रवेश परीक्षा देऊ शकतील.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती