Buddha Purnima 2020: जाणून घ्या महत्त्व आणि पूजा विधी

बुधवार, 6 मे 2020 (20:51 IST)
बुद्ध पौर्णिमा बुद्ध धर्मीयांचा महत्त्वपूर्ण सण आहे. वैशाख महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. बुद्ध पौर्णिमेला गौतम बुद्धांचे जन्म झाले होते. याच दिवशी गौतम बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती झाली तसेच याच दिवशी त्यांना मोक्ष प्राप्तीसुद्धा झाली होती. 
 
गौतम बुद्ध यांचे जन्म 563 इ.पू. वैशाख महिन्यातील पौर्णिमेला लुम्बिनी (सध्याच्या काळात नेपाळ) मध्ये झाले होते. याच दिवशी वैशाख पौर्णिमेला 483 ई.पू. वयाचा 80व्या वर्षी कुशीनगर येथे याना मोक्ष मिळाले. हे पहिले महात्मा आहे ज्यांना जन्म, ज्ञानप्राप्ती आणि मोक्षप्राप्ती तिन्ही एकाच दिवशी मिळाले असे. ह्याच दिवशी त्यांना बुद्धत्वची प्राप्ती झाली होती. 
 
बौद्ध धर्मीय लोक हा दिवस खूप उत्साहाने साजरा करतात. जगभरात कमीत कमी 180 कोटी लोक बुद्ध धर्मी आहे. बुद्धांना विष्णूंचा 9 वा अवतार मानला गेला आहे. हिंदूंसाठी हा एक पवित्र दिवस मानला जातो. भारत बरोबरच हा सण चीन, नेपाळ, सिंगापूर, व्हियेतनाम, थायलंड, जपान, कंबोडिया, मलेशिया, श्रीलंका, म्यानमार, इंडोनेशिया, पाकिस्तान, सारख्या देशांमध्ये साजरा केला जातो. 
 
बिहार मधील बोधगया पवित्र स्थळी सिद्धार्थ (बुद्ध) यांनी सत्य शोधण्यासाठी तपश्चर्या केली आणि बोधी वृक्षाच्या खाली त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली. त्या दिवसापासून हा दिवस बुद्धपौर्णिमेचा नावाने ओळखला जातो. 
 
या दिवशी बुद्धांची मोक्ष स्थळी कुशीनगर मधील "महापरिनिर्वाण विहार" येथे महिन्याभर जत्रे सुरू असतात. या विहारामध्ये गौतम बुद्धांची झोपलेली मूर्ती आहे. ज्याचे दर्शन घेण्यासाठी दूर वरून लोकं येतात. विहाराच्या पूर्वीमध्ये स्तूप आहे जेथे भगवान बुद्धांचे अंत्यसंस्कार केले गेले. 
 
श्रीलंका आणि इतर दक्षिण पूर्वी आशियाई देशांमध्ये या दिवसाला 'वैसाक' उत्सव म्हणून साजरा केला जातो. वैसाक हे वैशाख शब्दांचे अपभ्रंश आहे. या दिवशी बुद्ध धर्मीय घराला फुलाने सजवतात, दिवे लावतात, बुद्धांच्या मूर्तीसमोर दिवे लावतात. फळांचा नैवेद्य दाखवतात. बौद्ध ग्रंथाचे पठण करतात. 
 
या दिवशी बोधवृक्षाची पूजा करणे पण महत्त्वाचे असते. बोध वृक्षाच्या पारंब्यांना हार घालतात. त्यांना सजवतात. वृक्षाच्या भोवती दिवे लावतात. दूध आणि सुगंधी पाणी वाहिले जाते. अशी आख्यायिका आहे की या दिवशी चांगले कार्य करावे जेणे करून पुण्याची प्राप्ती होते. पिंजऱ्यामधून पक्ष्यांना मोकळे सोडतात. गरजूंना अन्न, वस्त्र दान दिले जाते. दिल्लीमधील बुद्ध संग्रहालयातील बुद्धांच्या अस्थींना भाविकांच्या दर्शनासाठी बाहेर काढतात. जेणे करून बौद्ध धर्मीय दर्शन करू शकतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती