‍प्रीती झिंटा अडकली विवाहबंधनात

अभिनेत्री प्रीती झिंटा अखेर विवाहबंधनात अडकली. तिने आपल्या बॉयफ्रेंड जेन गुडेनफसोबत लग्न केलं आहे. हा विवाह सोहळा अत्यंत खासगी पद्धतीने लॉस ऐंजेलिसमध्ये पार पडला. लग्नाला फक्त जवळचे मित्र आणि नातेवाईकच उपस्थित होते. 
 
वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार हा विवाहसोहळा २९ फेब्रुवारीला पार पडला. प्रीती झिंटा एप्रिल महिन्यात मुंबईत परतल्यानंतर सेलिब्रेशन करण्यासाठी मोठा कार्यक्रम ठेवणार आहे. या कार्यक्रमाला मित्र, नातेवाईकांसह बॉलिवूड सेलिब्रेटीजना आंमत्रित केले जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

वेबदुनिया वर वाचा