30 ऑक्टोबरला लग्नाच्या बेडीत अडकणार

शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020 (11:38 IST)
दक्षिणेतील प्रख्यात अभिनेत्री आणि बॉलिवूडमध्ये सिंघम चित्रपटाने लोकप्रिय झालेली अभिनेत्री काजल अग्रवाल 30 ऑक्टोबरला लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. गेल्या एक वर्षापासून काजलच्या लग्नाची तयारी तयारी सुरु आहे. प्रख्यात व्यावसायिक गौमत किचलू आणि काजलची एका कार्यक्रमात भेट झाली होती. पहिल्याच भेटीत त्यांचे एकमेकांवर प्रेम जमले.
 
त्यानंतर दोघांनीही एकमेकांच्य घरच्यांना सांगितले. घरच्यांनी एकत्र येत या दोघांच्या लग्नाला परवानगी दिली. गेल्या वर्षी या दोघांचा साखरपुडा झाला होता. आता काजलनेच 30 ऑक्टोबर रोजी मुंबईत लग्न होणार असल्याचे सांगितले आहे. कोरोनाकाळ असल्याने अत्यंत सावधानी आणि संपूर्ण काळजी घेऊन आम्ही हा लग्नसोहळा आयोजित केला आहे. हा एक अत्यंत जिव्हाळचा, कौटुंबिक सोहळा असल्याने यात फक्त आमचे कुटुंबीच हजर राहाणार आहेत. लग्नानंतर बंगळुरु आणि मुंबईत भव्य रिसेप्शन आयोजित करण्यात येणार असल्याचेही काजलने सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती