आमिर, अमिताभ यांचे बहुचर्चित चित्रपट ठग्ज ऑफ हिंदोस्तानचे ट्रेलर प्रदर्शित

शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018 (00:04 IST)
सर्वाना उत्सुकता लागलेल्या आणि यशराज चा सर्वात महागडा चित्रपट ठग्ज ऑफ हिंदोस्तानचा ट्रेलर प्रदर्शित असून त्यात अमिताभ बच्चन, आमीर खान, कतरिना कैफ, फातिमा सना शेख अशी तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट स्वातंत्र्यपूर्व काळात घडताना दिसत आहे. थोडा ट्रेलर हा पायरेट्स ऑफ कॅरेबिअन सारखा दिसत असून जबरदस्त ग्राफिक दिसत आहेत. या ट्रेलरमध्ये १७९५चा काळ दाखवण्यात आला असून, ट्रेलरच्या सुरुवातीलाच अमिताभ बच्चन यांची खुदाबक्ष आजाद नावाने  आपल्या समोर येते. सोबतच ब्रिटीशांच्या जुलुमांना विरोध करणारे खुदाबक्ष आणि झफिरा हे दोघेही ब्रिटीशांना जोरदार टक्कर देत आहेत. मग यांना थांबवायला अधिकारी फिरंगी नावाच्या तरुणाची निवड करताना दाखवण्यात आले आहेत. तो आमिर खान आहे. फिरंगी विरुद्ध आझाद हा सामना या चित्रपटात रंगताना दिसेल. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती