रामायणचा टी आर पी मालिका तोडणार 'ही' मालिका ?

शुक्रवार, 5 जून 2020 (10:20 IST)
सध्या देशात लॉकडाऊनमुळे पौराणिक मालिकांचे टीव्ही अर्थात छोट्या पडद्यावर पुनरागम होताना दिसतेय. सर्व गाजलेल्या मालिका एकामागून एक परत पुनर्र प्रसारित होत आहेर. यामध्ये रामायण, महाभारत, श्रीकृष्ण, विष्णू पुराण, देवांचे देव महादेव आणि श्री गणेश या मालिकांनंतर टीव्ही वर आता पुन्हा “ओम नमः शिवाय” ही प्रसिद्ध मालिका २३ वर्षांनी कलर्स वाहिनीवर प्रसारीत होणार आहे. 
 
यासाठी वाहिनी कलर्सने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर ‘ओम नमः शिवाय’ चे टीजर प्रसारित केले आहे.यामध्ये ‘ओम नमः शिवाय’ ही मालिका भगवान शिवच्या गौरवमय आणि चिरंतन जीवनाचा उत्सव साकारणारी एक महाकथा आहे. १९९७ मध्ये धीरज कुमार निर्मित ‘ओम नमः शिवाय’ या मालिकेत अध्यात्म, देवत्व आणि शक्ती यांचे वर्णन केले आहे.
 
यासह भगवान शिव विश्वाच्या नियतीला नियंत्रित करत असून या मालिकेत भक्तिपूर्ण कृत्ये, आसुरी लढाया, प्रसिद्ध शिव-तांडव आणि आपल्या भूतकाळाच्या इतर महत्त्वाच्या धार्मिक घटनांचे चित्रण केल्याने आकर्षक मार्गाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. या मालिकेत समर जय सिंह शिवच्या भूमिकेत यशोधान राणा हे कामाच्या भूमिकेत, गायत्री शास्त्री ही अभिनेत्री पार्वतीच्या भूमिकेत, मनजीत कुल्लर ही सती, संदीप मेहता हा नारद, अमित पचौरी हे विष्णूच्या भूमिकेत तर सुनील नागर याने ब्रह्माची भूमिका साकारली आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती