निगेटिव्ह रोलला मिळाला पॉझिटिव्ह प्रतिसाद

गुरूवार, 26 नोव्हेंबर 2020 (12:27 IST)
आश्रम या वेबसीरीजमध्ये बॉबी देओलने बाबा राम रहिमची निगेटिव्ह प्रतिमा रंगवली आहे. या निमित्ताने बाबा राम रहिमच्या कृष्णकृत्यांवर पुन्हा एकदा प्रकाश टाकला गेला. वेश्याव्यवसाय, शस्त्रास्त्रांची तस्करी आणि अनेक गैरप्रकार बाबा राम रहिमच्या आश्रमातून चाललेले उघड झाले होते. दुष्कर्माच्या गुन्ह्यात बाबा राम रहिम सध्या तुरुंगात आहे. या खलनायकी भूमिकेला प्रेक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल बॉबी देओलने प्रेक्षकांना धन्यवाद दिले आहेत. 
 
आपल्याला नकारात्मक रोलमध्ये बघून प्रेक्षक सकारात्मक प्रतिसाद देतील, अशी कल्पनही केली नव्हती. आतापर्यंत अशी नकारात्मक व्यक्तिरेखा साकारली नव्हती. त्यामुळे प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा असेल, याचा अंदाज येत नव्हता. पण प्रेक्षकांनी जे प्रेम दिले आहे, त्याबद्दल धन्यावद, असे बॉबीने इन्स्टाग्रामवर पोस्टमध्ये म्हटले आहे. ‘आश्रम'च्या माध्यमातून  बॉबी देओलने डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती