सनी लिओनीला लेस्बियन समजायचा तिचा नवरा

बुधवार, 1 एप्रिल 2020 (14:43 IST)
बॉलिवूडची हॉट अभिनेत्री सनी लिओनीने एका खुलासा केला आहे. त्यामुळे सनी पुन्हा एकदा चर्चेला विषय ठरली आहे. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सनीनं सांगितले की तिच्या नवर्‍याला ती समलैगिंक असल्याचा संशय होता.
 
हा धक्कादायक खुलासा करत ती म्हणाली की पती डॅनियल वेबरला भेटण्यापूर्वी ती ज्या मुलींसोबत राहत होती त्या लेस्बियन होत्या. यामुळं सनी देखील लेस्बियन असल्याचं डॅनियला वाटायचं. 
 
तसंच लास वेगासमध्ये माझ्या एका मैत्रिणीसोबत होते. आम्ही दोघी डॅनिअलच्या बँडमधल्या एका मुलाला भेटायला जात होतो. त्याचवेळी मला कॉमेडियन पॉली शोरसोबत डेटवर जायचं होतं, पण त्यानं मला फसवलं होतं', असं सनी म्हणाली.
 
यावर देवाची इच्छा होती की मी आणि सनी एकत्र यावं म्हणून ते घडून आल्याचं सनीच्या पती डॅनियलनं म्हटलं. तशीच सनी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती