Sooryavanshi Trailer: अक्षय कुमारचा अ‍ॅक्शन मोड खूपच जबरदस्त आहे, पहा सूर्यवंशीचा ट्रेलर

सोमवार, 2 मार्च 2020 (14:48 IST)
अक्षय कुमारच्या बहुप्रतीक्षित सूर्यवंशी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात अक्षयसोबत कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत आहे. अपेक्षेपेक्षा ट्रेलर अधिक दमदार आहे. अक्षयचा देशभक्त अवतारासोबत actionचा तडका देखील धमाकेदार आहे. चित्रपटात रणवीर सिंग आणि अजय देवगण काही सीन्समध्येही दिसले आहेत आणि तिघे एकत्र आले की मजा तिप्पट होते.
सूर्यवंशी हा चित्रपट यापूर्वी 27 मार्च रोजी प्रदर्शित होणार होता, पण आता हा चित्रपट 24 मार्चला प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमार यांनी ट्विट करून ही माहिती दिली. सुपर कॉप मालिकेच्या या चित्रपटाविषयी चाहत्यांमध्ये बरीच एक्साइटमेंट आहे.
 
रोहित शेट्टी यांच्या या कॉप युनिव्हर्स चित्रपटात रणवीर सिंग, सिंबा आणि अजय देवगण सिंघमच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचा टीझर बर्‍याच दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला होता, त्यामध्ये तिन्ही स्टार पोलिस अधिकारी म्हणून दिसले होते.
 
दशकानंतर अक्षय आणि कतरिनाची जोडी 'सूर्यवंशी' मध्ये दिसणार आहे. 2010 मध्ये दोघांनी तिस मार खान या चित्रपटात काम केले होते. अक्षय आणि कॅटरिनाशिवाय जॅकी श्रॉफ, सिकंदर खेर, अभिमन्यू सिंग आणि गुलशन ग्रोव्हर आणि इतर स्टार ‘सूर्यवंशी’ मध्ये दिसणार आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती