कोरोनामुळे सुप्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम रुग्णालयात दाखल

शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020 (09:08 IST)
सुप्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना करोनाची सौम्य लक्षणं दिसत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाच्या संचालकांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांना करोनाची लागण झाली होती. 
 
गेल्या दोन-तीन दिवसांपासून माझी तब्येत बरी नाहीये. सर्दी आणि ताप होता. त्यामुळे मी करोना चाचणी करून घेतली. तेव्हा रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आला. डॉक्टरांनी मला घरीच क्वारंटाइनमध्ये राहण्याचा सल्ला दिला”, असं त्यांनी या व्हिडीओत सांगितलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती