राणी अनुराग कश्यपसोबत कधीच काम करणार नाही

बरेच दिवस रुपरेी पडद्यापासून दूर राहिल्यानंतर अभिनेत्री राणी मुखर्जी आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. हिचकी या सिनेमातून भेटीला येणार आहे. लग्नानंतर तिने मोठ्या पडद्यापासून दूर राहणेच पसंत केले होते. आता बीएएफ वीथ वोग या कार्यक्रमामध्ये राणी गेली असता अनेक विषयांवर तिने मनमोकळेपणाने गप्पा मारल्या.
 
यावेळी जर पुन्हा अनुराग कश्यपसोबत काम केले तर माझ्या डोक्यात गोळी मारा असे बोल्ड विधान केले. त्याचे झाले असे की नेहा धूपियाने तिला रॅपिड फायर प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. यावेळी कोणत्या प्रसिद्ध सेलिब्रिटीने तुला चीट केले आहे का? या प्रश्नाचे उत्तर देताना तिने म्हटले की नाही... नाही.. असे कधीच झाले नाही. तसे झाले असते तर मी त्याला चपलेने मारले असते.
 
यानंतर नेहाने तिला कोणत्या सिनेमात काम केले नसते तर चांगले झाले असते? हा प्रश्न विचारला असता तिने बादल सिनेमाचे नाव घेतले. नंतर तिला गाळलेली जागा भरणारा प्रश्न विचारण्यात आला. 'माझ्या डोक्यात गोळी घाला जर मी सोबत काम केले तर' या प्रश्नाचे उत्तर देताना राणीने अनुराग कश्यपचे नाव घेतले. आता तिने कश्यपचे नाव का घेतले असेल हे तर राणीलाच माहीत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती