शाहरुख खानचा मुलगा आर्यन करेल बॉलीवूडमध्ये डेब्यू, हिरॉइन झाली फायनल

गुरूवार, 30 ऑगस्ट 2018 (12:18 IST)
आता शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन अॅक्टर बनणार असून त्याला बॉलीवूडमध्ये आणण्याची तयारी होत आहे. मोठ्या बजेटच्या चित्रपटाद्वारे  खान ज्युनियरला ऍक्टींगच्या मैदानात उतरणार आहे. सुरुवात चांगली झाली तर पुढचा प्रवास सोपा जातो. ही गोष्ट किंग खानपेक्षा चांगले कोणाला माहीत आहे कारण त्याच डोकं अॅक्टरपेक्षा जास्त बिझनेसमॅनचे आहे.
 
किंग खानच्या मुलाला अभिनयाच्या जगात आणण्याचा श्रेय बर्‍याच फिल्मकारांना घ्यायचे आहे, पण करण जौहर असताना कोण बाजी मारू शकतो. एक तर तो शाहरुख खानचा चांगला मित्र मात्र आहे आणि दुसरीकडे त्याला गॉडफादर बनण्याचा चस्का देखील आहे. वरुण धवन, आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा, जान्हवी कपूरला त्याने स्टार बनवले आहे आणि बॉलीवूडला नवीन स्टार्स दिले आहेत. आर्यनला देखील तो प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न करण्याचा श्रेय नक्कीच घेईल.
 
असे देखील म्हणण्यात येत आहे की हिरॉईन देखील फायनल करण्यात आली आहे. ती देखील स्टारकिड आहे. श्रीदेवीची मुलगी आणि जान्हवीची लहान बहीण खुशी कपूर. खुशी आणि आर्यन हीरो-हिरॉईनच्या रूपात रोमांस करताना दिसणार आहे. सांगण्यात येत आहे की खुशीला करण ने सांगितले आहे की तयारी सुरू करून दे आणि खुशीने लगेचच हे काम सुरू केले आहे. तिला नेहमी बघणार्‍यांनी सांगितले की खुशीत अचानक बदल आला आहे. ती आधीच्या तुलनेत जास्त ग्लॅमरस दिसू लागली आहे. तसेच आर्यनवर फार दबाव राहणार आहे. पहिल्या चित्रपटापासूनच त्याची तुलना शाहरुख खानशी होणार आहे.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती