'साहो'चे सॅटेलाईट राइट्स ३२० कोटींना विकले

सोमवार, 19 ऑगस्ट 2019 (15:20 IST)
'साहो' चित्रपटाचा  ट्रेलर सध्या सोशल मीडियावर  चर्चेत आहे. आता  'साहो' ने प्रदर्शनापूर्वीच ३२० कोटी रुपयांची कमाई केल्याचं बोललं जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रभास आणि श्रद्धा कपूर स्टारर या अॅक्शन चित्रपटासाठीचे सॅटेलाईट राइट्स ३२० कोटींना विकले गेले आहेत. चित्रपटाचं शूटिंग देशाबाहेर आणि देशातील अनेक ठिकाणी करण्यात आलं आहे. 'साहो'तील अॅक्शन सीनसाठी जगभरातील मोठ-मोठ्या अॅक्शन कोरियोग्राफरची मदत घेण्यात आली आहे. प्रभास आणि श्रद्धा व्यतिरिक्त चित्रपटात जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, चंकी पांडे, नील नितिन मुकेश अशी तगडी स्टारकास्टही भूमिका साकारणार आहे. 

सुजीथ दिग्दर्शित 'साहो' ३० ऑगस्टला तेलुगू, हिंदी, तमिळ आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती