राखी सावंतच शुभमंगल, सोशल मिडीया लग्नपत्रिका केली पोस्ट

आयटम गर्ल राखी सावंतने दीपक कलाल सोबत लग्न करत आहे. तिने थेट तिची लग्नपत्रिका सोशल मिडीयावर पोस्ट केली आहे.  आयुष्यभरासाठी एकमेकांची साथ देत दोन मनं एकत्र येणार आहेत, असं तिच्या लग्नाच्या पत्रिकेवर लिहिण्यात आलं आहे. त्याशिवाय तिच्या पत्रिकेवर लग्नाचं ठिकाण आणि वेळही नमूद करण्यात आलं आहे. 
 
दीपकने मला इंडियाज गॉट टॅलेंट या कार्यक्रमावर असताना लग्नाची मागणी घातली होती. ज्यानंतर मी त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. नुकतीच आम्ही लग्नाची तारीख निश्चित केली असून, लवकरच लग्नाच्या तयारीलाही सुरुवात होणार आहे. ज्याविषयी मी सर्वांना माहिती देत राहिनच', असं ती म्हणाली. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती