या प्रसिद्ध डिझाइनरने करण जोहरला म्हटले- प्यार किया तो डरना क्या

अलीकडेच बॉलीवूडचा मोस्ट स्टाइलिश निर्माता, दिग्दर्शक करण जोहरचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या दरम्यान अमेरिकन डिझाइनर प्रबल गुरुंगने स्वत:सोबत करणची एक फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या. 
हे तर सामान्य आहे पण प्रबलने ज्याप्रकारे फोटो पोस्ट केला त्यावरुन करण आणि त्यांच्या रिलेशनशिपबद्दल चर्चा होत आहे. त्या फोटोत प्रबल आणि करण एकमेकांच्या खूप जवळ उभे असून पोझ देत आहे. एवढेच नव्हे तर प्रबलने हे शेअर करत लिहिले आहे की- प्यार किया तो डरना क्या...हॅपी बर्थडे करण जोहर.
 
यावर करणने उत्तर दिले की, 'स्वत:वर ताबा ठेव भाऊ'. तरी यानंतर इंटरनेटवर या दोघांच्या चाहत्यांनी शुभेच्छा देणे सुरू केले.
 
प्रबल राणा गुरुंग प्रसिद्ध डिझाइनर आाहे, अलीकडेच मेट गाला यात ईशा अंबानीने प्रबलने डिझाइन केलेलं पर्पल गाऊन घातला होता. तसेच करणचे नाव यापूर्वी मनीष मल्होत्रासोबत देखील जुळलेले आहे. तरी मनीषने यावर नकार दिले होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती