या टॉप क्रिकेटरला डेट करत आहे बॉलीवूड एक्ट्रेस निधि अग्रवाल

शुक्रवार, 1 जून 2018 (08:55 IST)
टायगर श्रॉफासोबत चित्रपट 'मुन्ना माइकल'च्या माध्यमाने अॅक्ट्रेस निधि अग्रवालने बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. चित्रपट अपयशी ठरले आणि निधीचे पुढे काही जमले नाही जशी अपेक्षा होती.
 
या वेळेस निधी जवळ दोन चित्रपट आहे. एक हिंदी आणि दुसरे तेलगू. ती आपल्या करियरवर लक्ष केंद्रित करत आहे, पण सध्या ती दुसर्‍या कारणांमुळे चर्चेत आहे.
 
निधीचे नाव या वेळेस एक अशा क्रिकेटरशी जोडण्यात येत आहे ज्याने आयपीएलमध्ये उत्तम प्रदर्शन केले होते. दोघेही सोबत सोबत दिसत असून अशी चर्चा आहे की ती या क्रिकेटरला डेट करत आहे.
 
सांगण्यात येत आहे की निधी भारतीय क्रिकेटर के.एल. राहुलला डेट करत आहे. राहुल ने नुकतेच आयपीएल 2018मध्ये बर्‍याच धावा काढल्या होत्या. ह्या दोघांना बर्‍याच वेळा डिनरवर सोबत बघितले आहे.
 
बॉलीवूड आणि क्रिकेटमध्ये जुने नाते आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांचे नाते आता मैत्रीपेक्षाही पुढे गेले आहे.
पण निधीने हे मानण्यास नकार दिले आहे. ती म्हणते आम्ही बर्‍याचदा सोबत डिनर केले आहे. सोबत फिरतो पण रोमंस सारखे काहीच नाही.
 
निधीनुसार राहुलशी तिची ओळख फार जुनी आहे. जेव्हा निधी अॅक्ट्रेस नव्हती आणि राहुलला देखील क्रिकेटर म्हणून कोणी ओळखत नव्हत. टीनएजमध्ये दोघांची ओळख झाली होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती