सुशांतसिंह मृत्यूप्रकरणी अंमलीपदार्थ विरोधी ब्युरोकडून गुन्हा दाखल

गुरूवार, 27 ऑगस्ट 2020 (09:28 IST)
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी अंमलीपदार्थ विरोधी ब्युरोकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिच्या व्हॉट्सअप चॅटवरुन तिचा ड्रग्ज डिलर्सशी संपर्क असल्याचे समोर आले . तसेच तिने सुशांतलाही ड्रग्ज सेवनासाठी प्रवृत्त केल्याचं बोललं जात आहे.
 
याबाबत ईडीने रियाचे व्हॉट्सअॅप चॅट नुकतेच सीबीआयसोबत शेअर केले होते. नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोनं यामध्ये ड्रग्जचा वापर आणि व्यापार झाल्याचा ठपका ठेवला होता. रियाच्या व्हॉट्सअॅप चॅटमधून ती MDMA, हशिश आणि मारीजुना नवाच्या ड्रग घेत असल्याचं समोर आलं आहे. त्याचबरोबर सुशांतलाही तीने याचं सेवन करण्याबाबत सूचना केल्याचं बोललं जात आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती