मिशन मंगलमध्ये झळकणार ‘नरेंद्र मोदी’ ?

शनिवार, 20 जुलै 2019 (11:23 IST)
भारताच्या मंगळ मोहिमेची खरी कथा दाखविणारा “मिशन मंगल’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून या चित्रपटामध्ये अभिनेता अक्षय कुमार मुख्य भूमिका साकरत आहे. अक्षयने या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला असून काही क्षणातच या चित्रपटाचा  ट्रेलरने सोशल  मिडीआयवर धुमाकूळ घातला आहे तसेच  ‘मिशन मंगल’ चित्रपटात पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. मात्र अक्षयकुमारने याबाबत कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
 
दरम्यान, ट्रेलरमध्ये अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा,शर्मन जोशी हे दिसून येत आहेत. मंगळ मोहिमेची योजना आखण्यापासून ती यशस्वी करण्यापर्यंतचा प्रवास या ट्रेलरमध्ये दाखविण्यात आला आहे. हा चित्रपट येत्या 15 ऑगस्ट 2019 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती फॉक्‍स स्टार स्टुडिओ आणि केप ऑफ गुड फिल्म मिळून करणार आहेत.या चित्रपटामध्ये अक्षय कुमारने राकेश धवन ही भूमिका साकारली असून तो या मोहिमेचे नेतृत्व करताना दिसत आहे. त्याच्याव्यतिरिक्त या टीम तारा शिंदे (विद्या बालन), कृतिका अग्रवाल (तापसी पन्नू), एका गांधी (सोनाक्षी सिन्हा), शर्मन जोशी (परमेश्वर नायडू), नेहा सिद्दिकी (कृति कुल्हारी) या व्यक्तींची भुमिका साकारणार आहेत.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती