कंगना विराटला म्हणे ‘पंगों का सरताज’

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असते. यावेळी बॉलिवूडच्या या क्विनने चक्क भारतीय क्रिकेट कर्णधार विराट कोहलीशी पंगा घेतला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने विराटचे नवे नामकरण केले आहे.
 
विराट कोहली हा अत्यंत आक्रमक खेळाडू आहे. मैदानावर तो नेहमीच प्रतिस्पर्धी खेळाडूंशी पंगा घेताना दिसतो. त्यामुळे कंगनाने त्याचे नवे नाव ‘पंगों का सरताज’ असे ठेवले आहे.
 
कंगना रनौत सध्या ‘पंगा’ या आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात कंगना एका अनोख्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट कबड्डी या खेळावर आधारित आहे. ‘पंगा’ येत्या २४ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती