‘बच्चन पांडे’ चा दमदार पोस्टर लाँच

सोमवार, 29 जुलै 2019 (10:13 IST)
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या ‘मिशन मंगल’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु असतांना पुन्हा एकदा अक्षयने आपल्या नव्या चित्रपटाचे एक पोस्टर लाँच केले आहे. यामध्ये अक्षयचा हटके लूक पाहून सर्वांना धक्का बसला आहे. अक्षयला या नव्या लूकमध्ये पाहून ओळखणेही कठीण होत आहे. त्याच्या नव्या चित्रपटाचे नाव ‘बच्चन पांडे’ असं आहे.
 
अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’ चित्रपटातील नवा लूक पाहून सर्वत्र त्याच्या लूक बद्दल चर्चा सुरु आहे. या चित्रपटात अक्षयच्या गळ्यात मोठी चैन आणि काळी लुंगी घातलेली दिसत आहे. त्याच्या कपाळावरती चंदनचा टीळा आहे. तसेच अक्षयच्या हातात नान चाक दिसत आहे. अक्षय कुमारने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन त्याच्या नव्या चित्रपटाचा पोस्टर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत अक्षयने लिहिले की, साजिद नाडियावाला यांच्या येणारा चित्रपट बच्चन पांडे 2020 मध्ये लाँच होणार आहे. ख्रिसमसच्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती