‘राऊडी बेबी'च्या यशानंतर चाहते झाले नाराज

मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020 (15:11 IST)
दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषचा ‘मारी 2' हा चित्रपट सारंनाच ठावूक असेल. सध्या हा चित्रपट सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. या चित्रपटात धनुष आणि साई पल्लवी ही जोडी मुख्य भूमिकेत झळकली असून सध्या या चित्रपटातील राऊडी बेबी हे गाणं चांगलंच व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या गाण्याने अलीकडेच 100 कोटी व्ह्युवजचा टप्पा गाठला आहे. सध्या यूट्युबवर धनुष व साई यांचं राऊडी बेबी हे गाणं सुपरहिट ठरत असून या गाण्याने 100 कोटींचा टप्पा गाठल्यामुळे एकापार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे या पार्टीमध्ये या गाण्याशी संबंधित एक पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं. मात्र त्या पोस्टरमध्ये केवळ धनुष एकटाच झळकला आहे. त्यामुळे साई पल्लवीच्या चाहच्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 
 
या गाण्यात धनुषसोबत साईदेखील झळकली आहे. त्यामुळे पोस्टरमध्ये तिचादेखील फोटो असणं गरजेचं होतं असं तिच्या चाहत्यांनी म्हटलं आहे. जर या गाण्यात साई नसती तर हे गाणं सुपरहिट झालंच नसतं, असं एका नेटकरने म्हटलं आहे. तर हे अत्यंत चुकीचं आहे. साईशिवाय हे पोस्टर करणं योग्य नव्हतं. दरम्यान, 100 कोटी व्ह्युवजचा टप्पा गाठणारं हे पहिलं दाक्षिणात्य गाणं ठरलं आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती