धड़क ट्रेलर रिव्यू : बॉलीवूड फॉर्मूलात अडकलेले चित्रपट

सोमवार, 11 जून 2018 (14:11 IST)
धडक चित्रपटाबद्दल एवढे काही लिहिण्यात येत आहे जसे बॉलीवूडला दोन सुपर स्टार्स या महिन्यात मिळणार आहे. मराठी चित्रपट 'सैराट' चा हिंदी रीमेक करण जौहर यांनी बनवला आहे ज्यात श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आपल्या करियरची सुरुवात करणार आहे.
 
चित्रपट रिलीज होण्याअगोदरच श्रीदेवीचा मृत्यू झाला. त्यामुळे लोकांची सहानुभूती जान्हवीला मिळू शकते कारण लोक या चित्रपटाचे तिकिट विकत घेऊन श्रीदेवीला श्रद्धांजली देऊ शकतात.
 
चित्रपटात ईशान खट्टर नायक आहे ज्याला आम्ही 'बियॉण्ड द क्लाउड्स' मध्ये बघितले आहे. माजि़द मजीदी यांच्या या चित्रपटात ईशानने उत्तम अभिनय केला होता.
धड़कचे ट्रेलर बघितल्यावर ही टिपीकल बॉलीवूड मूव्ही वाटते. खालच्या तबक्याहून आलेला मुलगा आणि इंग्रजी बोलणारी मुलगी. दोघांमध्ये   आर्थिक अंतर दिसून येत. मुलगा मुलीचा पाठलाग करतो पण नंतर मुलीला तो आवडू लागतो. हीरोसोबत त्याचे मित्र ही असतात. चित्रपटात  ट्विस्ट आणि टर्न देण्यासाठी काही विलेन आहे. या चित्रपटात नवीन काहीच नाही.
 
जो पर्यंत स्क्रीन प्रजेंसचा प्रश्न आहे तर जान्हवीमध्ये चमक जरूर आहे पण तिची अॅक्टिंग दमदार नाही आहे. पण ट्रेलर बघून आपण आपले मत देणे योग्य नाही आहे. ईशान जास्त नॅचरल दिसत आहे.
चित्रपटाचे निर्देशन शशांक खेतान यांनी केले आहे ज्यांनी हम्प्टी शर्मा की दुल्हनिया आणि बद्रीनाथ की दुल्हनिया बनवले होते. ते लहान शहर आणि तेथील प्रेम कथेवर चित्रपट बनवण्यात माहिर असून काही या प्रकारे 'धडक'ची कथा दिसून येत आहे.
 
धड़कचे ट्रेलरला औसत मानले जात आहे. ईशान आणि जान्हवीपेक्षा जास्त शशांकच्या निर्देशनावर भरवसा करावा लागेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती