‘हसमुख’ वेब सीरिजबाबतची याचिका फेटाळली

बुधवार, 6 मे 2020 (07:35 IST)
नेटफ्लिक्सची ‘हसमुख’ ही वेब सीरिज सध्या खूपच चर्चेत आहे. ही सीरीज क्राईम आणि सस्पेंसने भरलेली आहे. १० भाग असलेली ही सीरिज १७ एप्रिलला प्रदर्शित झाली होती. पण या सीरीजमध्ये देशभरातील वकिलांचा अपमान करण्यात आला आहे असा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे या सीरीजवर बंदी घाला अशी मागणी केली गेली होती. मात्र उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे. 
 
हसमुख’ या वेबसिरीजमधून गुन्हेगारी विश्वातील घडामोडी दाखवण्यात आल्या आहेत. मात्र या घडामोडी दाखवताना यामध्ये काही प्रमाणात न्यायालयीन कामकाजात केला जाणारा भ्रष्टाचार देखील दाखवण्यात आला आहे. त्यामुळे ‘हसमुख’ च्या कथानकावर काही जणांनी आक्षेप घेतला होता. वकिली व्यवसायाला बदनाम करण्याचा हा कट असल्याचा आरोप त्यांनी केला होता. शिवाय या सीरिजवर बंदी घालण्यासाठी त्यांनी कोर्टात याचिका देखील दाखल केली होती. परंतु न्यायाधीश संजीव सचदेवा यांनी ही याचिका फेटाळून लावली आहे.
 
‘हसमुख’ ही एक डार्क कॉमेडी असलेली वेब सीरिज आहे. यामध्ये अभिनेता विर दास, रणवीर शौरी, आणि मनोज पाहवा यांनी मुख्य व्यक्तिरेखा साकारली आहे. निखिल गोंसालवीस यांनी या सीरिजचे दिग्दर्शन केले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती