'आदिपुरुष'ची डेट रिलीज

शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020 (13:57 IST)
अभिनेता प्रभासचा आगामी सिनेमा ‘आदिपुरुष' बर्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या सिनेमाची रिलीज डेटही समोर आली आहे. दिग्दर्शक ओम राऊतने ‘आदिपुरुष' चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. 
 
प्रभास स्टारर फिल्म ‘आदिपुरुष'च्या रिलीज डेटच घोषणा ओम राऊतने टि्वटरवरुन केली आहे. टि्वट करताना ओम राऊतने लिहिले, ‘आदिपुरुष' 11 ऑगस्ट 2022 ला सिनेमागृहात रिलीज होणार आहे. प्रभास आणि ओम राऊतच्या या सिनेमाचे बजेट खूपच जास्त असल्याची चर्चा आहे. पिंकविला रिपोर्टनुसार ‘आदिपुरुष'चा एकूण बजेट 350 ते 400 कोटींचा आहे. पौराणिक कथा रामायण यावर हा सिनेमा आधारित आहे. यामध्ये भगवान रामाची भूमिका प्रभास साकारताना दिसणार आहे.
 
बाहुबली सिनेमात प्रभास एक योद्धा म्हणून समोर आला होता. पण ‘आदिपुरूष'मध्ये त्याची भूमिका थोडी वेगळी आहे. या सिनेमात त्याला एक योद्धा कमी आणि धनुर्धर अधिक दिसायचं आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती