सूनबाई आणि सासूबाईंची जुगलबंदी पाहिली का ?

गुरूवार, 13 ऑगस्ट 2020 (10:18 IST)
अभिनेत्री म्हणजे समीरा रेड्डीने सोशल मीडियावर तिच्या सासूबाईंसोबतचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये सासुबाईंसोबतची तिची जुगलबंदी सध्या नेटकऱ्यांमध्ये कमालीची चर्चेत असल्याचं पाहायला मिळत आहे. 
 
कोण जास्त हक्क गाजवतं, कोण जेवण चांगलं बनवतं, तयार होण्यासाठी नेमकं कोण जास्त वेळ लावतं अशा काही प्रश्नांची उत्तरं या दोघी डोळे मिटून इशाऱ्यांच्या मदतीनं देत आहेत. हीच खरी या खेळाची गंमत. प्रश्नोत्तरांच्या या अनोख्या सत्रामध्ये अक्षय म्हणजेच समीराचा पती जास्त कोणाचं ऐकतो, असाही प्रश्न करण्यात आला. त्याचं उत्तर या दोघींनीही कोणत्या अंदाजात दिलं तो अंदाजच सध्या गाजत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती