बोल्ड अभिनेत्री पूनम पांडेला बलात्काराची धमकी, मुंबई पोलिसांनी लगेच दिला हा रिप्लाय

शनिवार, 7 डिसेंबर 2019 (15:58 IST)
हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार केले गेले. हैदराबाद हेथिल ही  घटना ताजी असतानाच बॉलिवूडची हॉट  बोल्ड अभिनेत्री पूनम पांडे हिने मुंबई पोलिसांना ट्विट करुन सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. पुनम पांडेने गुगलचे सीईओ सुंदर पिचई आणि मुंबई पोलिसांना आपल्या ट्विटमध्ये मेन्शन करत माझा मोबाईल नंबर तोतियागिरी अॅपवर शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे याची दखल घ्यावी, असे पुनम पांडेनं सांगितले आहे. 
 
माझा नंबर मोबाईल अ‍ॅपवरुन सार्वजनिक करण्यात आला आहे, याबाबत मी गुगलकडे सातत्याने लेखी तक्रार दिलीय. पण, कुठलिही कारवाई झाली नाही. मला, बलात्कार आणि अॅसिड हल्ल्याच्या धमक्या येत आहेत. त्यामुळे मी दिवसांतील 24 तास भितीदायक वातावरणात आहे.   सर, तरी आपण मला मदत करा, असे पूनम पांडेने आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे. सकाळीच पूनमने हे ट्विट केलं असून त्यानंतर काही वेळातच मुंबई पोलिसांनी पूनम पांडेच्या ट्विटला रिप्लाय दिला. आम्ही तुमच्या विनंती दखल घेत आहोत. तुमच्या संपर्क क्रमांकाबद्दल आम्हाला (DM) थेट मेसेज करा, असे मुंबई पोलीस आयुक्तांच्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती