OMG, 3 उकडलेल्या अंड्यांसाठी लावलेलं बिल बघून व्हाल हैराण

शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019 (11:44 IST)
प्रसिद्ध संगीतकार शेखर रविजानी यांना एका हॉटेलमध्ये 3 बॉयल एग ऑर्डर करणे चांगलंच महागात पडलं. अंड्याचं बिल बघून ते हैराणच झाले.
 
शेखर रविजानी यांनी हे बिल स्वत: सोशल मीडियावर शेअर केलं आहे. हॉटेलने केवळ 3 अंड्यांसाठी 1350 रुपये किंमत आणि टॅक्ससह 1672 रुपयांचे बिल फाडले. त्यांनी या बिलाचा फोटो शेअर करत लिहिले की, '3 अंड्यांसाठी 1672 रुपये? हे जरा अधिकच महागडं आहार नाहीये.
 
सोशल मीडियावर लोकांनी नाराजी जाहीर केली आहे. बिल बघून हैराण एका यूजरने विचारले की अंडी सोन्याची होती का? एका यूजरने सल्ला देऊन टाकाला की हयातऐवजी ठेल्यावरून अंडी घेतले असते तर 15 रुपायात काम झालं असतं.
एका इतर यूजरने टीका करत म्हटलं की हे मुळीच शॉकिंग नाही. 5 स्टार कोंबडीने अंडी दिले असतील तर स्टॅंडर्ड तर मॅच झालेच पाहिजे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती