अरशद वारसी बनणार फ्रॉड सैया

शनिवार, 1 डिसेंबर 2018 (15:17 IST)
बॉलिवूडमध्ये आपल्या कॉमिक अभिनयासाठी प्रख्यात असलेला अरशद वारसी हा सिल्व्हरस्क्रीनवर फ्रॉड सैया बनणार आहे. बॉलिवूड फिल्मकार प्रकाश झा सध्या फ्रॉड सैया बनवत आहेत. या चित्रपटामध्ये अरशद वारसी मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटामध्ये अरशद एकदा-दोनदा नव्हे, तर तब्बल तेरा वेळा विवाह करणार आहे. हा चित्रपट फसवणुकीवर आधारित आहे. चित्रपटामध्ये अरशद एका अशा व्यक्तीची व्यक्तिरेखा साकारत आहे, जो महिलांशी विवाह करून त्यांची फसवणूक करतो. तो अशा महिलांना टार्गेट करतो, ज्यांचे वय झालेले असते, परंतु विवाह झालेला नसतो. सौरभ शुक्ला यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या या चित्रपटाचे बहुतेक शूटिंग भोपाळमध्ये होणार आहे. प्रकाश झा यांनी सांगितले की, त्यांना या चित्रपटाची आयडिया त्यांची मुलगी दिशा व बिझनेस पार्टनर कनिष्क यांच्याकडून मिळाली आहे. हा चित्रपट एका वास्तववादी धोकेबाजाद्वारे प्रेरित आहे, ज्याने विविध शहरे व गावांमध्ये सात महिलांबरोबर विवाह केला होता. विवाह करण्याचा हा फंडा अरशदला चित्रपटामध्ये अनेक अडचणींत टाकताना दिसून येणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी 18 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती