व्हाईट वन पीसमध्ये अनन्या पांडेने लावला हॉटनेसचा तडका, फोटो झाले वायरल

शुक्रवार, 19 एप्रिल 2019 (16:01 IST)
चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे लवकरच करण जौहरचे चित्रपट 'स्टूडेंट ऑफ द ईयर 2'पासून बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार आहे. चित्रपटांमध्ये येण्याअगोदर अनन्या तिची स्टाइल, फॅशन आणि ड्रेसिंग सेंसमुळे चर्चेत राहत होती. नुकतेच चित्रपट स्टूडेंट ऑफ द ईयर 2 चे गीत 'जवानी'च्या लाँचिंगच्या वेळेस  अनन्या पांडेचा हॉट अंदाज बघायला मिळाला.  
 
अनन्या पांडे ने गाण्याच्या लाँचिंगच्या वेळेस शिमर व्हाईट वन पीस शार्ट ड्रेस परिधान केला होता. जे नीडल एंड थ्रेड कलेक्शनचे आहे. या लुकसोबत  अनन्या पांडे लाइट मेकअप, स्मोकी डोळे आणि लाइट पिंक कलरच्या लिपस्टिकमध्ये दिसली.  
अनन्या या ड्रेसमध्ये फारच सुंदर दिसत होती. या स्कारलेट सेक्विन मिडी ड्रेससोबत अनन्याने फारच सुंदर स्लीपर घातले होते. जे तिच्या लुकला कंप्लीट करत होते.  
अनन्या पांडे सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह असते. इंस्टाग्रामवर तिचे 1.6 मिलियन फॉलोअर्स आहेत. अनन्या नेहमी इंस्टाग्रामवर आपल्या हॉट आणि   बोल्ड अवतार शेअर करून चाहत्यांना इम्प्रेस करत असते. स्टूडेंट ऑफ द इयर 2 नंतर अनन्या पांडे 'पति पत्नी और वो'च्या रिमेकमध्ये दिसणार आहे.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती