अमिताभ बच्चन यांनी सोनाली कुलकर्णीला पाठवलं पत्र

बुधवार, 8 एप्रिल 2020 (16:55 IST)
कलाकार ‍कितीही मोठा असला तरी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची इच्छा प्रत्येक कलाकाराचं स्वप्नच असतं. अशात बिग बींचं स्वहस्ताक्षरातील पत्र मिळाल्यावर तर कोणाचीही आनंद गगनात मावेनासा होईल. असचं काही घडलंय आपल्या मराठमोळ्या सुंदर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसोबत. 
 
सोनालीने इन्स्टाग्रामवर पोस्ट पत्र पोस्ट करत लिहिले आहे की ‘अजून काय हवंय आयुष्यात.. महानायकाच्या हस्ताक्षरातील पत्र..’. या पत्राद्वारे बिग बींनी सोनालीचे ‘फॅमिली’ या शॉर्ट फिल्ममध्ये काम केल्याबद्दल आभार मानले आहेत. 
 
करोना विषाणूविरुद्धच्या या लढय़ात सगळ्यांनी घरातच राहणे महत्त्वाचे आहे हा संदेश देणारी ‘फॅमिली’ शॉर्ट फिल्म देशभरातील नामांकित कलाकारांनी आपापल्या घरातच राहून शूट केली आहे.
 
यात अमिताभ बच्चन, रजनीकांत, माम्मुट्टी, प्रोसेनजीत, दिलजीत दोसैन, रणबीर कपूर, अलिया भट्ट, प्रियांका चोप्रा यांच्याबरोबरीने मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही या शॉर्टफिल्मचा महत्त्वाचा भाग आहे. 
 
सोनालीने सांगितले की खुद्द अमिताभ बच्चन यांनी आपल्याला फोन करून या शॉर्टफिल्ममध्ये सहभागी होण्याविषयी विचारल्यावर माझा अंगावर काटा आला होता. या शॉर्ट फिल्मचा भाग होणे आनंदाच्या क्षणांपैकी असल्याचे सोनाली म्हणाली. 
 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 

!!!!!! THIS IS IT !!!!!!

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती