छत्रपती शिवरायांची भूमिका हा मराठी अभिनेता साकारणार, पोस्टर व्ह्यायरल

गुरूवार, 14 नोव्हेंबर 2019 (15:58 IST)
‘स्वराज्य’ निर्मितीच्या पवित्र कार्यात अनेक मावळ्यांनी आपले प्राण दिले आहेत. शिवकालीन इतिहासाच्या पानांवर या मावळ्यांचं कर्तृत्त्व सोनेरी अक्षरात नोंदवले गेले आहे. यातच मावळ्यांपैकी एक नाव म्हणजेच तानाजी मालुसरे होय. लवकरच तानाजींच्या पराक्रमाची कथा ही चित्रपटाच्या रुपात रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार आहे हे आता उघड झाले आहे. छत्रपती  शिवाजी महाराजांच्या भूमिकेचा फर्स्ट लूक अजयने प्रसिद्ध केला असून, हे [पोस्टर सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाले असून, त्या अभिनेत्याला सर्वांनी पसंती दिली आहे. 
 
तानाजी यांची भूमिका साकारणारा अभिनेता अजय देवगणनेच ट्विटवरुन एक ट्विट कर शिवाजी महाराजांचे पोस्टर शेअर केले असून ‘पत्थर से ठोकर तो सब खाते है, पत्थर को ठोकर मारे वो मराठा’ अशी ओळ ट्विट केली आहे. त्यात अजयने शिवाजी महाराजांचा चित्रपटातील लूक प्रसिद्ध केला आहे. डोक्यावर जीरेटोप, टोकदार दाढी, गळ्यात मोत्यांची माळ अशा राजेशाही थाटातील शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील फर्स्ट लूक या पोस्टरमध्ये दिसत आहे. तसेच घोड्यावर स्वार झालेले महाराज या पोस्टरमध्ये दाखवण्यात आले आहेत. शरद केळकर हा मराठमोळा अभिनेता शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती