प्रसिद्ध चित्रपट निर्माते मिलन लुथरिया यांच्या "कच्चे धागे" चित्रपटाची २५ वर्ष

सोमवार, 19 फेब्रुवारी 2024 (16:39 IST)
भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानासाठी ओळखले जाणारे प्रख्यात चित्रपट निर्माता मिलन लुथरिया यांना इंडस्ट्रीत २५ वर्षे पूर्ण होत असताना त्यांच्या शानदार कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा साजरा केला. हा महत्त्वाचा प्रसंग त्याच्या म्हणजे त्यांच्या दिग्दर्शनाच्या 25 व्या वर्षासोबत "कच्चे धागे" या चित्रपटाला देखील 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. 
 
 19 फेब्रुवारी 1999 रोजी रिलीज झालेल्या "कच्चे धागे" या चित्रपटाने आज 25 वर्ष पूर्ण केली आहेत.मनमोहक कथा, आकर्षक सादरीकरण आणि संस्मरणीय साउंडट्रॅकने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अजय देवगण आणि सैफ अली खान या डायनॅमिक जोडीचा समावेश असलेल्या या चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीला एक टर्निंग पॉईंट म्हणून ओळखले जाते. "कच्चे धागे" चा प्रवास आणि चित्रपटसृष्टीतील त्यांचा उल्लेखनीय प्रवास हा कमाली चा आहे. 
 
मिलन लुथरिया यांनी कृतज्ञता आणि उत्साह व्यक्त करताना म्हटले आहे की, "या अविश्वसनीय इंडस्ट्रीतील २५ वर्षे प्रवासाची गोष्ट कमाल आहे. खूप प्रेमाबद्दल मी कृतज्ञतेने भारावून गेलो आहे. 'कच्चे धागे' आणि माझ्या सर्व चित्रपटांना जगभरातील प्रेक्षकांकडून मिळालेला पाठिंबा हे कमालीचा आहे.
 
 हा एक अविस्मरणीय अनुभवांनी भरलेला एक विलक्षण प्रवास आहे" "कच्चे धागे" हा एक प्रतिष्ठित चित्रपट आहे, जो त्याच्या आकर्षक कथानकासाठी, दमदार कामगिरीसाठी प्रसिद्ध आहे. अजय देवगण आणि सैफ अली खान यांच्यातील डायनॅमिक केमिस्ट्री यातून प्रेक्षकांनी अनुभवली होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती