सोहाने सनी देओलला लगावली कानाखाली

शुक्रवार, 4 डिसेंबर 2015 (10:13 IST)
सोहा अली खानने सनी देओलच्या कानाखाली लगावली आहे. सनी देओलचा येणारा आगामी चित्रपट ‘घायल वन्स अगेन’ मध्ये सोहा अली खान अभिनेत्री आहे. या चित्रपटातील एका सीनमध्ये सनीला राग अनावर होतो असे दृश्य आहे. सनीला सामान्य करण्यासाठी सोहा त्याला जोरदार कानाखाली लगावते. हे दृश्य शूट करत असताना ती जरा जास्तच जोशमध्ये होती आणि तिने एक जोरदार कानाखाली लगावून दिली.

या प्रकाराने सनीला राग आला असेल असे सोहाला वाटले, परंतु सनी सीन छान झाल्यामुळे खूश झाला होता. ‘ढाई किलो का हाथ’ हा सनीचा डायलॉग खूप प्रसिद्ध आहे. 
 
पण हा सोहाचा पावकिलोचा हाथ सनीच्या कायम स्मरणात राहील. ‘घायल वन्स अगेन’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही सनी देओलने केले आहे.
 

वेबदुनिया वर वाचा