मायकल जॅक्सनसाठी शाहीदने नाकारले होते ‘बर्थ डे गिफ्ट’

‘उडता पंजाब’ या आगामी चित्रपटात शाहीद रॉकस्टारच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्यानिमित्ताने शाहीदने ‘यार मेरा सुपरस्टार’ या टेलिव्हिजन वाहिनीवरील एका शोमध्ये उपस्थिती लावली होती. त्यावेळी बोलताना लहानपणी माकल जॅक्सनचे आपल्याला किती वेड होते याचा एक किस्सा शाहीदने कथन केला. 
 
शाहीद म्हणाला की, माकल जॅक्सनच्या लाइव्ह शोला उपस्थित राहण्याची माझी मनापासून इच्छा होती. 1995 साली माकल जॅक्सन भारतात आला होता. तेव्हा या शोचे तिकीट 3 हजार रुपये इतके होते. मला कोणत्याही परिस्थितीत कार्यक्रमाला जायचे होते. त्यासाठी पुढील पाच वर्षे माझ्या बर्थ डेला कोणतेही गिफ्ट दिले नाहीस तरी चालेल पण माकल जॅक्सन
च्या शोचे तिकीट मला काढून दे, असा हट्ट मी आईकडे केला होता. त्यानंतर काही दिवस आपला दैनंदिन खर्च कमी करून थोडेङ्खार पैसे जमा केले आणि उर्वरित पैसे मी आईकडून घेतल्याचे शाहीदने यावेळी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा