दीपिकाच्या ‘XXX’ने जिंकली चाहत्यांची मने

दीपिका पदुकोणचे सर्वच चाहते गेल्या काही दिवसांपासून तिच्या पहिल्या वहिल्या हॉलिवूडपट ‘XXX : द रिटर्न ऑफ जेंडर केज’ या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रतीक्षा करत होते. 
 
दीपिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नुकताच ‘XXX : द रिटर्न ऑफ जेंडर केज’ चा ट्रेलर शेअर केला आहे. बुधवारी प्रदर्शित झालेल्या ‘XXX : द रिटर्न ऑफ जेंडर केज’च्या ट्रेलरने सर्वाना झटकाच दिला आहे. यात विन आपण जगत असलेल्या आताच्या जगाचे समर्थन करणार्‍या एका सोल्जरच्या भूमिकेत दिसतो. तर सॅम्युअल एल जॅक्सन हा आताचे जग अजिबात सुरक्षित नसल्याचे बोलताना दिसतो. 
 
पण यात दीपिका कुठे आहे? ट्रेलरमध्ये तीन सीन्समध्ये दीपिकाची झलक पाहावयास मिळते. यात ती चाकू आणि गनने लढताना दिसते. मात्र यात दीपिकाला एकही संवाद दिलेला नाही. 
 
या चित्रपटाचा दोन दिवसांपूर्वी टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. यात दीपिकाने आपल्या बोल्ड अंदाजाने अगदी काही मिनिटांत चाहत्यांची मने जिंकली होती. पुढच्या वर्षी 20 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

वेबदुनिया वर वाचा