अरिजीतने मागितली सलमानची माफी

बॉलीवूडमध्ये ही गोष्ट तर सर्वांना माहीत आहे की एकदा सलमानला कोणावर राग आला तो त्या व्यक्तीला सहजासहजी माफी देत नाही. विवेक ऑबेरॉय पासून ते शाहिद कपूरपर्यंत सलमानने कोणालाही माफी दिलेली नाही. हेच लक्षात घेता प्रसिद्ध पार्श्वगायक अरिजीत सिंगने सलमानची फेसबुकवर जाहीर माफी मागून सलमानच्या सुल्तान सिनेमातून त्याचं गाणं हटवून नाही ही विनंती केली आहे.
एका कार्यक्रमात पार्श्वगायक अरिजीत सिंगकडून अनवधानाने अभिनेता सलमान दुखावला गेल्याने अरिजीतने माफी मागितली आहे.
 
ही गोष्ट तेव्हा घडली जेव्हा सलमान रितेशसोबत गिल्ड अवार्ड होस्ट करत होते. अरिजीतला अवार्डसाठी हाक मारण्यात आली पण तो थोड्या वेळाने स्टेजवर पोहचला. यावर सलमानने विचारले की झोप लागली होती का? त्यावर अरिजीत म्हणाला की आपल्यामुळेच झोपलो होता. याचा अर्थ सलमानची होस्टिंग बोरिंग होती म्हणून मला झपकी आली असा लावण्यात आला. त्यावर सलमान म्हणाला की तू गातोच असा की लोकं झोपून जातात. त्यामुळे सलमान- अरिजीतमध्ये दुरावा निर्मित झाला. घडलेल्या प्रकाराबद्दल अरिजीतने सलमानची दूरध्वनीद्वारे आणि मेसेजद्वारे माफी मागण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला सलमानने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे अरिजीतने त्याच्या अधिकृत फेसबुक पेजवरून माफी मागितली. मात्र त्यामध्येही नेमकी घटना काय घडली याबाबत तपशील दिलेला नाही.
 
उल्लेखनीय आहे की सलमान दुखावला गेला असून त्याने "सुलतान‘ या त्याच्या आगामी चित्रपटात अरिजितने गायलेले एक गीतदेखील काढून टाकले आहे. तसेच ते गीत दुसर्‍या गायकाकडून गाऊन घेतले आहे. 
 
"त्या कार्यक्रमात जे घडलं त्यात तुम्हाला दुखवायचा माझा हेतू नव्हता. मी तुमच्याशी खूप वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तुमच्याकडून काही उत्तर आले नाही. तरी मी येथे तुमची जाहीरपणे माफी मागतो. "सुलतान‘चे ते गाणे तुम्हाला दुसर्‍या कोणाकडून गाऊन घ्यायचे असेल तर त्याला माझी काहीच हरकत नाही. फक्त माझ्या आवाजातील गाणे अबाधित राहू द्यावे अशी मी तुम्हाला विनंती करतो‘, असे माफी मागणारे पत्रही अरिजीतने फेसबुकवरून काढून टाकले आहे.
 

वेबदुनिया वर वाचा