अनुभवा रोपवेची धमाल

मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020 (16:58 IST)
दोस्तांनो, यंदाच्या हिवाळ्यात निसर्गाच्या जवळ जायचं आहे? तेही हटके अंदाजात? मग तुम्ही रोप वेचा पर्याय निवडू शकता. भारतातल्या अनेक ठिकाणचे रोप वे प्रसिद्ध आहेत. आसपासचा दर निसर्ग, सूर्यास्त यांचं रोप वेमधून उंचावरून दर्शन घडतं. ट्रेकिंग, कार किंवा बाईक राईड हे निसर्गदर्शनाचे काही पर्याय असले तरी रोप वे काहीतरी वेगळं देऊन जातो. त्यातच थोडं धाडस केल्याचं समाधानही लाभतं. भारतातल्या प्रसिद्ध रोप वेंची ही माहिती.
* दार्जिलिंग हे निसर्गरम्य ठिकाण मानलं जातं. इथलं घनदाट जंगल, उंच पर्वतरांगा, चहाचे मळे, धबधबे आणि ना बघून मन मोहून जातं. हे सगळं उंचीवरून पाहण्याची मजा काही औरच. म्हणूनच 1968 साली इथे रोप वे सुरू करण्यात आला. या रोप वे मधून हिमालयाचं सुंदर
दर्शन घडतं.
* काश्मीरमधलं निसर्गसौंदर्य सुहास साळुंखे अनुभवायचं असेल तर गुलमर्गला जायला हवं. गुलमर्गचा रोप वे जगातला दुसर्याल क्रमांकाचा सर्वात उंच रोप वे आहे. या रोप वेमधून काश्मीर डोळ्यात साठवून घेता येतं.
* महाराष्ट्रातल्या रायगडमधला रोप वेही प्र्रसिद्ध आहे. या रोप वेच्या माध्यमातून रायगड किल्ल्यावर जाता येतं. हा रोपवे तुमच्या  बजेटमध्ये बसू शकतो. यासोबतच रायगडच्या आसपासची पर्यटन स्थळंही तुम्ही पाहू शकता. 
* उत्तराखंडमधल्या देहरादूनमधलं मसुरी हे थंड हवेचं ठिकाण प्रसिद्ध आहे. इथल्या गन हिलमध्ये रोप वे आहे. या रोप वे मधून मसुरी खूप छान दिसतं. मसुरीमधली इतर ठिकाणंही तुम्ही बघू शकता.
* मनालीमधलं सोलंग हे खोरं म्हणजे निसर्गसौंदर्यांचा खजिना. हिमालयाचा सुंदर नजारा तुम्हाला आकर्षित करेल. या ठिकाणी तुम्ही विविध प्रकारचे धाडसी क्रीडाप्रकारही करू शकता. इथल्या रोप वेने माउंट फट्रूपर्यंत जाऊ शकता. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती