जनतेच्या पैशातून कंगनाला वाय प्लस सुरक्षा का - उर्मिला मातोंडकर

बुधवार, 16 सप्टेंबर 2020 (15:20 IST)
अभिनेत्री कंगना राणावतला वाय प्लस सुरक्षा दिल्याच्या मुद्द्यावरून अभिनेत्री उर्मिला मातोंडकरनं केंद्र सरकारवर टीका केली आहे. जनतेने टॅक्सरुपात भरलेल्या पैशातून कंगना राणावतला वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचं कारण काय, असा सवाल तिने विचारला आहे.

"काही लोकांबद्दल मनात द्वेष आहे म्हणून संपूर्ण इंडस्ट्रीला बदनाम करणं हे अतिशय आक्षेपार्ह, निंदनीय आहे. बॉलीवूडमध्ये पैसा आणि प्रसिद्धी मिळवली, त्याच बॉलीवूडला बदनाम करण्याचं काम कंगना करत आहे," असंही उर्मिला म्हणाली

"कंगनाला दिलेल्या वाय प्लस सुरक्षाव्यवस्थेचे पैसे कोण देतो? 'अॅक्ट ऑफ गॉड' म्हणून सामान्य नागरिक टॅक्सपासून पळून जाऊ शकत नाहीत. त्या करदात्यांच्या पैशातून कंगनाला सुरक्षा दिली गेली, ती काय म्हणून दिली गेली," असा प्रश्न उर्मिलाने विचारलाय.

दरम्यान, मुंबई महापालिकेची आपल्या पाली हिलमधील बंगल्यावर केलेली कारवाई अवैध असून त्याप्रकरणी त्यांनी दोन कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी कंगना राणावतने केलीय.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती