भाजप-शिवसेना युतीबाबतची घोषणा होण्याची आज शक्यता- शाहनवाज हुसैन

सोमवार, 30 सप्टेंबर 2019 (17:01 IST)
'आमचं ठरलंय,' असं म्हणत शिवसेना आणि भाजपचे नेते युती होणार असंच सांगत आहेत. कोणाच्या वाट्याला किती जागा, हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे.
 
मात्र युतीबाबतचा हा सस्पेन्स लवकरच संपण्याची शक्यता आहे. आज युतीबद्दल घोषणा होऊ शकते, अशी माहिती भाजपचे नेते शाहनवाज हुसैन यांनी पत्रकारांना दिली.
 
या घोषणेसोबतच भाजप आपल्या उमेदवारांची पहिली यादीही जाही करू शकतो, असं हुसैन यांनी म्हटलं.
 
रविवारी (29 सप्टेंबर) भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक दिल्लीत पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत महाराष्ट्र आणि हरियाणातील जागावाटपासंबंधी चर्चा झाली.
 
या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
 
खरं तर कालच ही घोषणा होणार होती पण काल उशिरापर्यंत ही बैठक चालली त्यामुळे ही घोषणा होऊ शकली नाही असं हुसैन यांनी सांगितलं.
 
दरम्यान, युतीची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच शिवसेनेनं काही उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करायला सुरूवात केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती