'ते काल-परवाही पुन्हा येईन म्हणाले, आशा ठेवायला हरकत नाही' - शरद पवार

बुधवार, 25 नोव्हेंबर 2020 (15:59 IST)
"निराशा माणसाला स्वस्थ बसू देत नाही त्यांची सत्ता गेली याची ही अस्वस्थता आहे. त्यांनी मागेही 'मी पुन्हा येईन... मी पुन्हा येईन' असं म्हटलं होतं आणि काल परवाही असंच काहीसं म्हटलं आहे. त्यांनी आशा ठेवायला काहीही हरकत नाही," अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर केली आहे.
 
भाजप नेते जयसिंगराव गायकवाड यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी (24 नोव्हेंबर) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या कार्यक्रमात बोलताना पवार यांनी भाजपवर टीका केली.
 
"राज्यातील महाविकास आघाडी सरकारला मिळणारा सर्वसामान्यांचा पाठिंबा पाहून काही लोकांना नैराश्य आलं आहे. या नैराश्येतूनच हे सर्वकाही होत आहे. आपल्याला सत्ता मिळणार नाही, यासंबंधीची अस्वस्थता आणि संताप आहे तो या माध्यमातून व्यक्त केला जात आहे," असं पवार म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती