अयोध्येत 10 डिसेंबरपर्यंत कलम 144 लागू

सोमवार, 14 ऑक्टोबर 2019 (12:25 IST)
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत जमावबंदीचा कायदा म्हणजेच कलम 144 लागू करण्यात आला आहे. अयोध्या जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश अनुज कुमार झा यांनी याबाबतचा आदेश दिला आहे.
 
दिवाळी आणि इतर सण तसंच सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी यांच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत कलम 144 लागू करण्यात येत आहे. 10 डिसेंबरपर्यंत तो इथं लागू असेल. बाबरी मशीद पाडण्यात आलेला दिवस 6 डिसेंबर आहे. त्यामुळे या दिवसापर्यंत कलम 144 लागू करण्याची आवश्यकता होती, असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती