पीएमसी बँकेच्या खातेदारांना दिलासा

गुरूवार, 16 जानेवारी 2020 (12:46 IST)
पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बँकेतील घोटाळ्यामुळे अडचणीत सापडलेल्या खातेदारांना दिलासा मिळाला आहे. खातेदारांचे पैसे मिळावेत यादृष्टीने घोटाळ्यासाठी कारणीभूत असलेल्या एचडीआयएल कंपनीच्या मालमत्तांचा जलद लिलाव करण्यासाठी समिती स्थापन झाली आहे.
 
मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एस. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली या तीन सदस्यांची समिती स्थापन झाली आहे. एचडीआयएलचे प्रवर्तक राकेश आणि सारंग वाधवान यांना वांद्रे येथील निवासस्थानी नजरकैदेत ठेवण्यात यावे, लिलावात तांत्रिक अडथळा येणार नाही याची खबरदारी वाधवान यांनी घ्यावी असेही उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात म्हटले आहे.
 
लिलाव जलद गतीने होण्यासाठी वकील सरोश दमानिया यांनी अँड. जे. एन. जैन यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली होती.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती