आता देशात खासगी रेल्वे

देशात लवकरच खासगी कंपन्याकंडून चालवण्यात येणाऱ्या रेल्वे विविध मार्गांवर धावणार आहेत. त्यासाठी नियमांचा मसुदा निती आयोगाकडून करण्यात आला आहे. खासगी रेल्वेगाड्यांसाठी महत्त्वाच्या तरतुदी त्यामध्ये आहेत.
 
या तरतुदींनुसार खासगी रेल्वे गाड्यांना स्वतःचे कर्मचारी नेमता येतील. त्याबरोबरच या गाड्यांचा कमाल वेग ताशी 160 किमी ठेवण्याला मंजुरीही मिळाली आहे. ज्या मार्गांवर खासगी रेल्वेगाडी धावणार आहे, त्या मार्गांवर 15 मिनिटांच्या काळात भारतीय रेल्वेला आपली गाडी सोडता येणार नाही असंही त्या मसुद्यात लिहिलं आहे. 
 
या प्रकल्पानुसार देशात 100 मार्गांवर 150 खासगी रेल्वेगाड्या धावणार आहेत. त्यासाठी 22 हजार 500 कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती